उत्तराखंडमध्ये एक भयंकर कार अपघात झाला असून त्यामध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मसुरी-डेहराडून मार्गावर चुनाखाल जवळ एक भरधाव कर खोल दरीमध्ये कोसळली आहे. या कारमध्ये कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हे विद्यार्थी मसुरी फिरायला आले होते. अधिकारींनी सांगितले की, सकाळी साडेपाच वाजता मसुरी येथे थांबल्यावर हे विद्यार्थी डेहराडून जात होते. या दरम्यान अचानक भरधाव कार वरील कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट खोल दरीमध्ये कोसळली.
सूचना मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना दरीमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान दोन विद्यार्थ्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. जेव्हा 3 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच की विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे. या विद्यार्थिनीवर उपचार सुरु आहे.