Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पर्यटकांनी भरलेली केबल कारची ट्रॉली हवेत अडकली, सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका

Webdunia
सोमवार, 20 जून 2022 (18:41 IST)
हिमाचल प्रदेशातील परवानू येथे केबल कार हवेत अडकली3 तासांच्या अथक परिश्रमानंतर सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला.माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

सोलन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या म्हणण्यानुसार- प्रवाशांना वाचवण्यासाठी केबलवर ट्रॉली लावण्यात आली होती. बचाव उपकरणाच्या मदतीने प्रवाशांना कौशल्या नदीच्या खोऱ्यात खाली उतरवले जात आहे. टिंबर ट्रेल ऑपरेटरचे तांत्रिक पथक तैनात असून पोलिसांचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. एसडीएम धनबीर ठाकूर यांनी सांगितले की, एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.
 
दोन केबल कारमध्ये एकूण 15 लोक अडकले आहेत.
 
4 लोक वर आणि 11 लोक खाली टेकडीजवळ अडकले होते.पहिल्या टप्प्यात 4 जणांची सुटका करण्यात आली.खालच्या टेकड्यांच्या ट्रॉलीमध्ये 11 जण अडकले होते.

एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये ट्रॉली हवेत लटकत असल्याचे दिसत आहे.बचावकार्य सुरूच आहे.एका माणसाला दोरीच्या साहाय्याने खाली उतरवले जात आहे.कसौलीचे एसडीएम धनबीर ठाकूर यांनी सांगितले की, एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.
 
अडकलेल्यांमध्ये काही महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.तांत्रिक बिघाडामुळे ही केबल कार रस्त्याच्या मधोमध अडकल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.सर्व पर्यटक दीड तासांहून अधिक काळ तेथे अडकले असल्याचे काही प्रसारमाध्यमांतून सांगण्यात येत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments