Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘तेजस एक्सप्रेस’मधील एलसीडी स्क्रीन काढणार

Webdunia
गुरूवार, 24 जानेवारी 2019 (10:07 IST)
‘तेसज एक्स्प्रेस’ २०१७ साली मुंबई – गोव्यादरम्यान धावायला लागली. या ट्रेनमध्ये प्रवाशांना विशेष सुविधा देण्याच्या उद्देशाने वायफाय, सीसीटीव्ही, चहा – कॉफीसह एलसीडी स्क्रीन, हेडफोन उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. मात्र काही चोरांनी रेल्वेने पुरवलेले २०० रुपये किंमतीचे हेडफोन बदलून त्याजागी हलक्या आणि अगदी कमी किंमतीचे हेडफोन तिथे लावून ठेवल्याचे उघड झाले आहे. बऱ्याच एलइडी स्क्रीनची देखील मोडतोड करण्यात आली. त्यामुळे आता ‘तेजस एक्सप्रेस’मधील एलसीडी स्क्रीन काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
‘तेजस एक्सप्रेस’मध्ये प्रवाशांना कंटाळा येऊ नये. तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा यासाठी विमान सेवेप्रमाणे ‘तेजस एक्सप्रेस’मध्ये एलसीडी स्क्रीन बसवण्यात आल्या होत्या. या स्क्रीनवर प्रवासी प्रवास करताना चित्रपट पाहू शकत होते. तर ज्या व्यक्तींना गाणी ऐकण्याची आवड असलेल्या व्यक्ती गाणी देखील ऐकू शकत होत्या. तर लहान मुले गेम देखील खेळू शकत होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments