Kerala News : केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील एक कोटी रुपयांच्या चोरीच्या प्रकरणाची उकल पोलिसांनी केली आहे. वालापट्टनम भागातील एका तांदूळ व्यावसायिकाच्या घरातून एक कोटी रोख आणि 300सॉवरेन गोल्ड बॉन्ड चोरीला गेले. तसेच तांदूळ व्यावसायिक आपल्या कुटुंबासह नातेवाईकाच्या लग्न समारंभाला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी शेजाऱ्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बराच तपास केल्यानंतर 30 वर्षीय आरोपीची चौकशी करण्यात आली. आरोपीने चोरीची कबुली दिली आहे. तपासादरम्यान केरळ पोलिसांनी सांगितले की, पोलिसांचे स्निफर डॉगही आरोपीच्या घरासमोर उभे होते. पोलिसांनी आरोपींकडून चोरीची रोकड आणि सोने जप्त केले आहे. तांदूळ व्यापारी केपी अश्रफ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अशरफ आणि त्यांचे कुटुंबीय एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मदराई येथे गेले होते. 19 नोव्हेंबर रोजी आरोपींनी ही चोरी केली होती. सोने आणि रोख रक्कम बेडरूमच्या लॉकरमध्ये होती. किचनच्या खिडकीचे ग्रील कापून चोरट्याने घरात प्रवेश केला होता. 24 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. त्यानंतर तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले.