Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1 ऑक्टोबर पासून होणार हे मोठे बदल,जाणून घ्या आपल्यावर काय परिणाम होईल

Webdunia
बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (09:56 IST)
1 ऑक्टोबरपासून दैनंदिन जीवनाशी संबंधित बँकिंग सेवांच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आपल्यावर काय होईल. जाणून घ्या  
 
 डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे नियम बदलतील : 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये मोठा बदल होऊ शकतो. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे या नियमाच्या अंमलबजावणीमुळे बँका आणि पेटीएम-फोन पे सारख्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी ईएमआय किंवा बिलाचे पैसे कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. त्यांना त्यांच्या व्यवस्थेत असे बदल करावे लागणार की एकदा परवानगी दिल्यावर प्रत्येक वेळी पैसे आपोआप कापले जाऊ नये. 
 
 3 बँकांची चेकबुक निरुपयोगी होतील : अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची चेकबुक 1 ऑक्टोबरपासून निरुपयोगी होतील. या 3 बँका इतर बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत.अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. ग्राहक जवळच्या बँक शाखेत नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकतात. इंटरनेट बॅंकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारेही नवीन चेकबुकची मागणी केली जाऊ शकते.
 
ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरू होतील : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली आहेत. पण अशी काही राज्ये आहेत जिथे चित्रपटगृहे उघडली गेली नाहीत. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचे नावही समाविष्ट करण्यात आले.कोविड मार्गदर्शक तत्त्वांनुसार 22 ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा चित्र हॉल आणि चित्रपटगृहे उघडली जातील.महाराष्ट्र सरकारने 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा आणि 7 ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे उघडण्याच्या सूचना जारी केल्या होत्या.
 
 पेट्रोल डिझेल महाग होईल: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील. तेल कंपन्या दोन्ही इंधनांची किंमत दररोज सकाळी 6 वाजता निश्चित करतात. एलपीजीच्या किमतीतही या महिन्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments