Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jammu Kashmir मध्ये दहशतवादी हल्ला, Indian Army च्या वाहनावर गोळीबार, तीन जवान शहीद

Webdunia
गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (20:14 IST)
Indian Army Vehicle Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. गुरुवारी लष्कराच्या वाहनावर गोळीबार झाला, त्यात तीन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी हल्ले राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात दोन लष्करी वाहनांवर झाले. पुंछ जिल्ह्यातील सुरणकोट तहसीलमधील बफलियाज पोलीस स्टेशन मंडी रोडकडे जाणाऱ्या लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. काल संध्याकाळपासून या भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या संयुक्त कारवाईत हे जवान भाग घेणार होते.
 
जखमी जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवादी घात घालून हल्ले करत आहेत. शोध मोहिमेदरम्यान किश्तवाड पोलिसांना परवेझ अहमद उर्फ ​​हरिस या दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले आहे. भारतीय पोलीस गेल्या 18 वर्षांपासून या दहशतवाद्याचा शोध घेत होते.
 
दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर दिले. पोलिस आणि लष्कराची कारवाई सुरूच आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments