Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोकियो ऑलिम्पिक 2020: मणिपूर सरकारने जाहीर केले की, रौप्यपदक विजेती मीराबाई चानू यांना 1कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.

Webdunia
रविवार, 25 जुलै 2021 (13:27 IST)
भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या दुसर्‍या दिवशी भारोत्तोलन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला.चानूने 202 किलो (87 किलो + 115 किलो) उचलून महिलांच्या 49 किलो गटात रौप्यपदक जिंकले. शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राज्य सरकार एक कोटी रुपयांचे पारितोषिक देईल, अशी घोषणा मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी केली आहे.
 
शनिवारी मीराबाईने भारताला पदकांच्या यादीत स्थान मिळवून दिले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह आणि आठ पूर्वोत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा कळले की मीराबाई चानू यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक जिंकले आहे, तेव्हा त्यांनी उभे राहून वेटलिफ्टरला शुभेच्छा दिल्या. मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी बैठकी दरम्यान ही बातमी दिली, असे एका अधिकाऱ्याने  सांगितले. यानंतर गृहमंत्री आणि सर्व मुख्यमंत्र्यांनी उभे राहून या कर्तृत्वाचा उत्सव साजरा केला. शहा बैठकीचे अध्यक्ष होते.
 
त्यांनी सांगितले की 26 वर्षांच्या या वेटलिफ्टरचे विशेष पदक सुरक्षित ठेवले आहे. बीरेनसिंग मीराबाईशी बोलताना म्हणाले, मी  बैठकीत माहिती दिली की मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडले आहे. ही बातमी ऐकून आणि हातात माईक घेऊन अमित शहाजी खूप आनंदित झाले ते म्हणाले की, हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. उल्लेखनीय आहे की वेटलिफ्टिंग कार्यक्रमात चानूने 21 वर्षानंतर भारताला पदक दिले. चानूपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments