Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

UPSC: पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्रातील तिघं

Webdunia
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (20:35 IST)
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून या परीक्षामध्ये बिहार राज्यातील शुभम कुमार देशात प्रथम आला आहे. तर  जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्राची मृणाल जोशी आणि विनायक नरवदे हे 36 आणि 37 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर विनायक महामुनी हा युपीएससी परीक्षामध्ये 95 व्या स्थानी आला आहे.
 
कोरोना महामारीमुळे सगळ्याच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे युपीएससीची मुलाखत प्रक्रिया देखील लांबणीवर गेली होती. त्यामुळे मुख्य निकालही उशिरा लागला आहे. युपीएससीची मुख्य परीक्षा जानेवारी 2021 मध्ये पार पाडली होती. तर मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झाल्या होत्या.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षासाठी जनरल मधून 263, ईडब्लूएसमधून 86, ओबीसीप्रवर्गातून 229, तर एससी 122 आणि एसटी मधून 61 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. एकूण 761 जागांसाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302 आणि ब गटातील प्रशासकीय सेवा 188 या पदांसाठी उमेदवारांची निवड झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments