Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Uttarakhand Rape Murder Case: उत्तराखंडच्या उधमपूर मध्ये नर्सवर बलात्कार करून निर्घृण हत्या

Webdunia
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (17:16 IST)
कोलकाता मध्ये डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याची घटना ताजी असता आता उत्तराखंडच्या उधम नगरच्या रुद्रपूर मध्ये एका 33 वर्षीय नर्सवर बलात्कार करून दगडाने डोकं ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला अटक केली असून आरोपीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे त्याने कबूल केले आहे. पीडितेच्या सांगाडा पोलिसांना एका आठवड्यांनंतर झुडपात आढळला.

पीडित महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती.रुद्रपूरच्या उधम सिंह नगर शहरातील बिलासपूर कॉलनीत ती आपल्या 11 वर्षांच्या मुलीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. 30 जुलै रोजी संध्याकाळी घरी येताना आरोपीने तिला बस स्थानकावरून एकटी येताना बघून तिचा पाठलाग केला. तिचे घर जवळ आल्यावर त्याने तिचे तोंड दाबून तिला झुडपात नेले आणि बळजबरी करू लागला. महिलेने त्याला विरोध केला तर तिच्या डोक्यात मारले. या मुळे ती जखमी झाली. नंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिच्या ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. तिची ओळख पटू नये या साठी आरोपीने तिचे डोके आणि चेहरा दगडाने ठेचला. 
 
बहिणीने ती घरी परत आली नाही म्हणून तिच्या बहिणीने पोलिसांना ती बेपत्ता असल्याची तक्रार केली. शोध घेत असताना पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि 8 ऑगस्ट रोजी सकाळी डिबडीबा परिसरातील एका रिकाम्या प्लॉटमध्ये परिचारिकेचा सांगाडा सापडला.पोलिसांनी शोध घेतल्यावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांना एक व्यक्ती नर्सच्या मागे येताना दिसली. त्याची ओळख पटवण्याच्या प्रयत्नात मयताचा मोबाईल ट्रेस झाला मयत महिलेचा फोन आरोपीची पत्नी वापरात असल्याचे पोलिसांना समजले आणि  पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि त्याने गुन्हा कसा केला हे देखील सांगितले. 
Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments