Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Uttarkashi : बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी प्रार्थना सुरु

uttarkashi tunnel rescue operation
Webdunia
रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (14:14 IST)
यमुनोत्रीमहामार्गावर सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. आज अथवा दिवस आहे. लोक मजुरांच्या सुरक्षेसाठी  प्रार्थना करत आहे. लोक त्यांच्यासाठी बोगद्याच्या बाहेर बनवलेल्या मंदिरात देवाला प्रार्थना करत आहे. या बोगद्यात गेल्या 8 दिवसांपासून 41 कामगार अडकले आहे.

बोगद्याच्या बाहेर मजूर, मदत कार्य करणाऱ्या पथकातील लोक, माध्यमकर्मी आणि पोलिसांची गर्दी आहे.
त्याशिवाय विविध प्रकारची यंत्रं असलेल्या गाड्या आणि क्रेनचा वापर यासाठी केला जात आहे.आतमध्ये अडकलेले मजूर ठिक असल्याची माहिती मिळत आहे. 

मजुरांना ऑक्सिजन, पाणी आणि खाण्याचे पदार्थ पाठवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आत दोन किलोमीटरपर्यंत ते चालू शकतात आणि त्यांची मानसिक स्थितीही उत्तम आहे, असंही ते म्हणाले.
"मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना काय लागेल, यासाठीची रंगीततालिम सध्या केली जात आहे. तसंच वैद्यकीय पथक, पोलिसांचं पथक आणि मदतकार्य करणाऱ्यांच्या समन्वयानं हे काम
सुरु आहे. 
बोगद्याबाहेर त्यांचे नातेवाईक आणि सहकारी कामगार चांगली बातमी येण्याची वाट पाहत हिरमुसून बसलेले आहेत. त्यांना माध्यमांशी बोलायला बंदी घातली असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
बोगद्यात अडकलेले मजूर आणि ज्यांच्याशी आम्ही बोललो, ते सर्व मजूर हा बोगदा आणि हायवेचं काम करणारी कंपनी नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेड (एनईसीएल) साठी काम करतात.
गिरिडीहमधील एका मजुरानं म्हटलं की, त्याचे अनेक मित्र अडकलेले असल्यानं तो चिंतेत आणि तणावात आहे.
 रात्रपाळी संपण्याच्याआधीच पहाटे 5 वाजता बोगद्यात 200 मीटर अंतरावर वरचा एक भाग खाली कोसळला हा अपघात रविवारी दिवाळीच्या दिवशी पहाटे झाला.आणि अंदाजे 70 मीटरचा ढिगारा तयार झाला.गिरिडीहमधून आलेल्या मजुरानं त्याच्या म्हणजे झारखंड राज्यातील 15 मजूर फसलेले असल्याचं सांगितलं
 
 आत 400 मीटरचा डोंगर अजूनही कापलेला नाही. अपघात झाला ती जागा प्रवेशद्वारापासून 200 मीटर अंतरावर आहे. त्यापुढं 70 मीटर मातीचा ढिगारा आहे. नंतर पुढे बोगदा आहे.
आत वीज असून पाणी आणि ऑक्सिजन एका पाईपातून सोडले जात आहे. खाण्याची पाकिटंही त्यातून पाठवली जात आहेत.
आत अडकलेले मजूर बिहार, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालचे सर्वाधिक आहेत.
 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments