Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विजय माल्ल्या इतक्यात भारतात येणार नाही

Webdunia
गुरूवार, 4 जून 2020 (16:37 IST)
१४ मे रोजी विजय माल्ल्याने भारताकडे प्रत्यार्पणाविरोधात लंडनच्या कोर्टात केलेली शेवटची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे पुढच्या २८ दिवसांमध्ये विजय माल्ल्याला भारताच्या हवाली करणं आवश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री विजय माल्ल्याचं कुठल्याही क्षणी भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकतं, असं जाहीर झालं. पण विजय माल्ल्या भारतात इतक्यात तरी येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
 
विजय माल्ल्याचं कुठल्याही क्षणी भारताकडे प्रत्यार्पण होणार असल्याच्या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नाही. त्याचं प्रत्यार्पण करण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झाल्याची कोणतीही माहिती आलेली नाही. खुद्द विजय माल्ल्याच्या असिस्टंटने सांगितल्याप्रमाणे तिला स्वत:ला माल्ल्याच्या भारतात येण्याबाबत काहीही माहिती नाही. त्याशिवाय खुद्द माल्ल्याने देखील या गोष्टीला नकार दिला आहे. प्रत्यार्पणाविषयीचं माध्यमांमध्ये आलेलं वृत्त खरं आहे का? असं विचारलं असता ‘ते काय म्हणत असतात ते फक्त त्यांनाच माहिती’, असं म्हणत माल्ल्यानं या वृत्ताला उडवून लावलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments