Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Viral Video मंदिराच्या खिडकीतच अडकला चोर

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (11:27 IST)
सोशल मीडियावर मनोरंजनाचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एकदा एक ऑडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चोर आपल्याच कारनाम्यात अडकला आहे. आंध्र प्रदेशातून समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये चोर चोरी करण्यासाठी खिडकी तोडून मंदिरात घुसला होता. मंदिरातून चोरी केल्यानंतर चोर बाहेर पडत असताना खिडकीत अडकला.
 
काय आहे प्रकरण : सोशल मीडियावर व्हायल व्हिडिओमध्ये एक तरुण मंदिराच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पापा राव असे या तरुणाचे नाव असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. चोरीच्या उद्देशाने खिडकी तोडून तो मंदिरात गेला, मात्र बाहेर येताना तो खिडकीतच अडकला.
 
विचित्र स्थितीत अडकल्यानंतर तरुणाने गजर केला तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. मंदिराच्या खिडकीजवळ पोहोचल्यावर तो तरुण खिडकीतून अर्धा बाहेर पडल्याचे लोकांनी पाहिले. ही परिस्थिती पाहता स्थानिक लोकांनी तरुणाला बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो चोरी करत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. मंदिरातील चोरीचे दागिने पोलिसांनी तरुणाकडून जप्त केले आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments