Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पदाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांच्या उत्तरामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय चर्चा वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका पॉडकास्ट शोमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ज्याचा व्हिडिओ बुधवारी प्रसिद्ध झाला. या पॉडकास्टमध्ये, सीएम योगी यांनी तिसऱ्यांदा यूपीचे मुख्यमंत्री होण्याबद्दल उत्तर दिले. त्यांच्या उत्तरामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. तसेच राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की सेवा, सुरक्षा आणि सुशासनाचे मॉडेल आमच्या पक्षाचे होते आणि उत्तर प्रदेशात त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज जनतेचे व्यापक आशीर्वाद आमच्या पक्षाला आहे.
ते म्हणाले की मी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार नाही. आमचा पक्ष प्रयत्न करेल. भाजपचा कोणताही सदस्य मुख्यमंत्री होऊ शकतो. तसेच माहिती समोर आली आहे की, मुख्यमंत्री योगी यांनी आधीच सांगितले आहे की, एकदा त्यांना या ओझ्यातून मुक्तता मिळाली की ते गोरखपूरला जातील.