Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुचाकीवर स्टंट करताना यू ट्युबरचा अपघात

Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (12:21 IST)
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. ते आपला जीव देखील धोक्यात टाकतात. अनेकदा त्यांच्या सोबत अपघात देखील होतात. सोशल मीडिया वर प्रसिद्ध  यूट्यूबर TTF वासन यांचा कांचीपुरम, तामिळनाडू येथे अपघात झाला . ते दुचाकीवर 'व्हीली' नावाचा स्टंट करत असताना अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी पलटी होऊन घसरली . दरम्यान, युट्युबर्सही दुसऱ्या बाजूला पडले. या घटनेत वासन गंभीर जखमी झाले. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
'व्हीली' स्टंटमध्ये दुचाकीचे पुढचे चाक हवेत उंचावले जाते आणि मागच्या टायरच्या मदतीने चालवले जाते. हा स्टंट धोकादायक आहे. 

वृत्तानुसार, 17 सप्टेंबर रोजी वासन चेन्नईहून कोईम्बतूरला बाईकवर जात होते. बलुचेट्टी चथिराम ओलांडत असताना सर्व्हिस लेनवर त्याचा अपघात झाला. भरधाव वेगामुळे दुचाकी 100 मीटरपर्यंत घसरली आणि रस्त्याच्या कडेला पडली. वासन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्टंट करताना वासनने संरक्षणात्मक गियर घातले होते.
 
वासन एक प्रसिद्ध मोटोव्हलॉगर आणि  यूट्यूबरआहे. त्याचे ट्विन थ्रॉटल्स नावाचे यूट्यूब चॅनल आहे, ज्याचे 40 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. यावर ते त्याच्या हायस्पीड बाइक राईडशी संबंधित व्हिडिओ आणि व्लॉग पोस्ट करत असतात . असे धोकादायक स्टंट आणि वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल त्याने अनेकदा दंडही भरला आहे. अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस उपचारानंतर युट्युबरची चौकशी करणार आहेत. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments