Dharma Sangrah

झाकीर नाईक प्रकरणी न्यायिक लवादाने ईडीला फटकारले

Webdunia
बुधवार, 10 जानेवारी 2018 (10:50 IST)

वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा प्रमुख झाकीर नाईक प्रकरणी न्यायिक लवादाने याप्रकरणी ईडीला फटकारले आहे. न्या. मनमोहन सिंग यांनी नाईकची सील केलेली संपत्ती ईडीच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. मी अशा १० महाराज-बाबांची नावे सांगू शकतो, ज्यांच्याकडे १० हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे आणि त्यांच्याविरोधात गुन्हेगारीविषयक खटलेही सुरू आहेत. तुम्ही यापैकी एकाच्या विरोधात तरी कारवाई केलीय का, असा सवाल न्या. मनमोहन सिंग यांनी ईडीच्या वकिलांना विचारला.

लवादाच्या अध्यक्षांनी म्हटले की, ईडीने मागील १० वर्षे शारीरिक शोषणाचा आरोप असलेल्या आसारामची संपत्ती जप्त करण्याबाबत काहीच कारवाई केलेली नाही. पण नाईकप्रकरणी ते खूपच जलदगतीने काम करताना दिसत आहेत, असे म्हटले.  जेव्हा आरोपपत्रातच अपराध निश्चित करण्यात आलेले नाही. मग संपत्ती जप्त करण्यासाठी काय आधार आहे, असे ईडीच्या वकिलांना विचारण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments