Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिजीत भट्टाचार्यला अटक

Webdunia
शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (11:18 IST)
ट्विटरवर अपशब्द वापरल्याविरोधात आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी गायक अभिजीत भट्टाचार्यविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर गायक अभिजीत भट्टाचार्यला अटक करण्यात आली.

चेन्नईतील इंजिनिअर तरुणाच्या हत्येमधील आरोपी मुस्लिम असल्याचा दावा अभिजीतने ट्वीटमध्ये केला होता. त्यानंतर अभिजीत समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेत अडथळा आणत असल्याचं ट्वीट स्वाती चतुर्वेदी यांनी केलं होतं. यावेळी स्वाती यांनी मुंबई पोलिसांनाही मेन्शन करत अभिजीतवर कारवाईची मागणी केली होती. पण यानंतर अभिजीतने स्वातीविरोधात अश्लील शब्द वापरुन गरळ ओकली होती. यानंतर आप नेत्या प्रीती मेनन यांनी अभिजीतविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेत पोलिसांनी अभिजीतविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर तातडीने जामीन मिळाल्याने त्याची सुटकाही झाली.  अभिजीतचे आक्षेपार्ह ट्वीट डिलीट करावे किंवा त्याचं अकाऊंट बंद करावं, अशी मागणी मुंबई पोलिसांनी ट्विटरकडे केल्याचं प्रीती मेनन यांनी सांगितलं.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख