Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित शहा होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

Webdunia
मंगळवार, 8 जुलै 2014 (16:14 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू आणि भाजपचे सरचिटणीस अमित शहा यांच्या नावाची भाजपअध्यक्षपदी बुधवारी (9 जुलै) अधिकृत घोषणा होणार आहे. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत अमित शहा यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमित शहा यांना केंद्रसरकारने नुकतीच झेड प्लस सुरक्षा दिली आहे. त्यावर चौफेर टीका करण्यात आली आहे. शहा यांच्याकडे कुठलेही प्रशासकीय पद नसताना त्यांना दिलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाला होता.

अमित शहा यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही यापूर्वी हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर अमित शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.

तसेच लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात अमित शहा यांनी आपल्या पक्षाला महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. उत्तर प्रदेशातील 80 पैकी 72 जागा भाजपला  त्यांनीच जिंकून दिल्या होत्या. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments