Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अल्लाह म्हणत घाला योगासने!

Webdunia
शुक्रवार, 12 जून 2015 (10:44 IST)
आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी २१ जून रोजी योगासने करताना मुस्लिम बांधव श्लोक म्हणण्याऐवजी अल्लाचे नामस्मरण करू शकतात, असे प्रतिपादन योगदिन कार्यक्रमाचे नियोजन करणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमातून सूर्यनमस्कार वगळण्यात आल्यानंतर आता सरकारने आणखी नमते घेत योगासने करताना श्लोक म्हणणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करून देशातील मुस्लिम बांधवांना मोठ्या संख्येत या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

नाईक म्हणाले, देशात योगदिन कार्यक्रमात लोकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे आणि कुठल्याही वादंगाशिवाय तो सुरळीत पार पडावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सूर्यनमस्काराचा धमार्शी संबंध नाही, असही ते म्हणाले.  सुदृढ आरोग्यासाठी नियमित योगासने आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना याला विरोध करणारे दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांना केला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments