Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असं कसं हे प्रेम? सासूने जावयाशी केलं लग्न...

Webdunia
गुरूवार, 16 जून 2016 (11:41 IST)
पाटणा- बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील पुरैनी गावात एक अनोखंच प्रेम प्रकरण गाजलंय. येथील एक महिला आपल्या मुलीच्या नवर्‍याच्या प्रेमात पडली. प्रेम प्रकरण वाढलं आणि सासूने जावयाशी लग्न केलं. सासू आणि जावयाला पती-पत्नीच्या रूपात बघून मुलगी बेशुद्ध पडली.
 
कोर्टात महिलेने केलं जावयाशी लग्न: आशा देवी हिने काही वर्षापूर्वीच आपल्या मुलीचं लग्न खूप धूमधडाक्याने लावलं होतं, पण आता तिने जावयाबरोबर पूर्णिया कोर्टात लग्न केले. यासाठी कोर्टाच्या काही वकिलांनी गवाही दिली. हे नातं समोर आल्यावर आधीतर मुलगी बेशुद्धच पडली आणि नंतर तिला धक्काच बसला. तिला हे कळतंच नाहीये की ज्या आईने तिचं संसार थाटला तिचं आई त्याला मोडायला का निघाली.
 
आजारी जावयाला बघायला गेली सासू आणि प्रेमात पडली: लग्नाच्या काही दिवसानंतरच सूरज आजारी पडला. आजारी जावयाला बघण्यासाठी सासू त्याचा घरी पोहचली. आणि त्याची सेवा करताना असं काही घडलं की दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले.
 
वेड लागले प्रेमाचे: सासू स्वत:च्या घरी परत आली पण तिचे हृदय मात्र जावयापाशी राहिले होते. आता दोघांना प्रेमाचे वेड लागले होते. दोघं तासोतास एकमेकाशी फोनवर बोलायचे. सासरा दिल्लीच्या एका फॅक्टरीत कामाला होता म्हणून जावई अधून-मधून सासूला भेटायला येऊन जायचा. एक दिवस असाही आला की सूरज पत्नीला सोडून सासरीच राहायला लागला.
 
पंचायत ने दिली परवानगी: गावकर्‍यांना हे प्रकरण कळल्यावर पंचायतने दोघांना बरोबर राहण्याची परवानगी दिली. पंचायतप्रमाणे सासू आणि जावयात अतूट प्रेम आहे म्हणून त्यांना वेगळं करणे योग्य नाही. यात कोणालाही आक्षेप नसावा. पंचायताच्या या निर्णयामुळे सासू-जावई खूप खूश आहेत.
 
मुलीला आपल्यासोबत घेऊन गेले वडील: सूरजचा सासरा आपल्या मुलीला घेऊन आपल्या गावात परतून गेला. त्याने म्हटले की जेव्हा दोघांनी लग्न करूनच घेतलं आहे तर मुलीला त्याच्याजवळ सोडणे योग्य नाही.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments