Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आकाशातून उल्का पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

Webdunia
चेन्नई- उल्का पडण्यासारखे चमत्कार बघायला मजा येते. तुटता तारा इच्छा पूर्ण करतं हे ऐकले होते पण यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतं असा विचार कधीच आला नाही. तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये मात्र एका व्यक्तीचा मृत्यू उल्कापातामुळे झाल्याची घटना घडली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता यांनी ही माहिती दिली आहे.
 
वेल्लोरमधील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात शनिवारी रात्री एक उल्का कोसळली. यामुळे प्रचंड आवाज झाला असून जवळबासच्या इमारतीच्या काचाही फुटल्या. तिथेच काम करणाऱ्या कामराज नावाच्या व्यक्तीचा यामुळे मृत्यू झाला. या उल्कापातात इतर तीन जण जखमी झाले आहेत.
 
ही घटना खूप दुर्मिळ आहे. उल्कापातामुळे महाविद्यालयाच्या परिसरात एक खड्डाही तयार झाला आहे. राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी या ठिकाणी जाऊन हा उल्कापात असल्याची खात्री केली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments