suvichar

आज गुजरात बंद

Webdunia
बुधवार, 26 ऑगस्ट 2015 (11:03 IST)
आरक्षणाच्या मुद्यावरून सुरु केलेल्या आंदोलनाबाबत हार्दिक पटेल यांना अटक आणि सुटका झाल्यानंतर आक्रमक झालेल्या पटेल समाजाने आज गुजरात बंदची हाक दिली आहे.

हार्दिक पटेल यांना काल अटक करण्यात आल्यानंतर आंदोलकांचा भडका उडाला होता व जाळपोळीचे सत्र सुरू झाले. पटेल यांची सुटका झाल्यानंतरही राज्यातील वातावरण पेटलेलेच असून या तणावाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये १३ वर्षांनंतर नऊ भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

तसेच सूरत व अहमदाबादमधील शाळा- कॉलेजेस आज बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान गुजरातमधील या आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

Show comments