Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आसाराम बापूंना सोडा अन्यथा एकाची विमानाचे उड्डाण नाही

Webdunia
सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (11:19 IST)
स्वयंघोषित अध्यात्मिक संत आसाराम बापू सध्या जेलमध्ये आहे. त्यांच्यावर आश्रमातील अल्पवयीन मुलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. परंतु आसाराम बापूंना सोडा अन्यथा एकाचे विमानाचे उड्डाण होऊ देणार नसल्याचे डबोक येथील महाराणा प्रताप विमानतळावर धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

'आसाराम बापूंना 15 दिवसांमध्ये मुक्त करा, नाहीतर भारतात एकही विमान उडू देणार नाही. संपूर्ण देश उद्धवस्त करुन टाकू.' अशा धमकीचा फोन आला आहे. या फोननंतर विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.पोलिस अधिकारी रेवंत दान यांनी सांगितले, की विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ऑफिसमध्ये लँडलाइनवर मोबाईलवरुन धमकीचा फोन आला होता..

विमानतळ प्राधिकरणाचे विशेष कार्यकारी अधिकारी विनय दाहिमा यांनी डबोक पोलिस स्टेशनमध्ये धमकीच्या फोनची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments