Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाढवांच्या बाजारात लालू- नितीश जोडी हिट

Webdunia
उज्जैन- मध्य प्रदेशात कार्तिक एकादशीदरम्यान गाढवांचा मोठा पारंपरिक बाजार भरत असून, यंदाच्या बाजारात लालू- नितीश नावे दिलेली गाढवे सर्वाधिक आढळून आली आहेत. यामुळे बाजारात ही जोडी सर्वाधिक हिट ठरली आहे.
 
दरवर्षी शहरामध्ये गाढवांचा मोठा बाजार भरतो. बाजारादरम्यान गाढवांना अभिनेता- अभिने‍त्रींची नावे दिलेली पाहायला मिळतात, मात्र बिहार विधानसभा निवडणूकीदरम्यानच्या निकालानंतर गाढवांना लालू- नितीश अशा नावाची सर्वाधिक गाढवे आढळून आली आहेत.
 
येथील बाजारामध्ये देशातील विविध भागांमधून ग्राहक गाढवे खरेदीसाठी येतात. चार हजार रुपय्यांपासून ते चाळीस हजार रुपय्यांपर्यंत गाढव विकले जाते. बाजारादरम्यान कोट्यवधी रुपय्यांची उलाढाल होते. उलाढालीदरम्यान लालू-‍ नितीश हा शब्द सर्वाधिक उच्चारला जात आहे. प्रथमच राजकीय नेत्यांची नावे बाजारादरम्यान पाहायला मिळाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments