Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोमातेसाठी मारणार अन् मरणारही : साक्षी महाराज

Webdunia
बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (11:08 IST)
गोमातीसाठी मरण्यास आणि मारण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.
 
गोमांस खाण्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशमधील दादरी येथे एका मुस्लिम व्यक्तीची जमावाने हत्या केली होती. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी, भारताला हिंदूराष्ट्र करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून याप्रकरणी संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करावा, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचा साक्षी महाराज यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आमची स्वत:ची आई आहे तशीच आमची भारतमाता आहे. आणि तशीच गायही माता आहे. जर कोणी आमच्या आईला मारण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत. आम्ही मरण्यासाठी आणि मारण्यासाठी तयार आहोत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments