Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चेन्नई: केस प्रत्यरोपणामुळे तरुणाचा मृत्यू

Webdunia
चेन्नई- डोक्यावरील केस प्रत्यरोपणाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 
 
चेन्नई येथील 22 वर्षाच्या संतोष नावाच्या तरुणाला डोक्यावर टक्कल पडल्यामुळे त्याने मागील महिन्यात केस प्रत्यरोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत संतोषचा मृत्यू झाला.
 
संतोषच्या डोक्यावर ऍडव्हान्स्ड रोबोटिक पद्धतीने 1200 केस लावण्यात आले होते. केस प्रत्यरोपणानंतर दहा तासांनी संतोषला ताप आला आणि नंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती संतोषच्या आईने दिली. शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर नव्हते तसेच संतोषच्या मृत्यूनंतर ते फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments