Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जम्मूत पुराचा कहर, नऊ जवान वाहून गेले (पाहा फोटो)

Webdunia
शनिवार, 6 सप्टेंबर 2014 (17:08 IST)
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यु झाला आहे. बचाव पथकातील नऊ जवान वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
 
राज्यातील अनंतनाग, पुलवामा, शोपिअन, उधमपूर परिसरात पूरस्थिती अजूनही कायम आहे. जम्मूतील जवळपास दहा जिल्ह्यात पुराने थैमान घातला आहे. 30 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे.
 
झेलम नदीसह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे.  दक्षिण श्रीनगर परिसरात प्रशासनाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. पुलवामा जिल्ह्यात बचावकार्य करताना लष्कराचे नऊ जवान वाहून गेल्याचे माहिती समोर आली आहे. परंतु प्रशासनाकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. 
 
केंद्र आणि राज्य शासनातर्फे बचावकार्यासाठी सात हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहे. लष्काराचे जवान हेलिकॉप्टरच्या पूरग्रस्तांना मदत करत आहे. बचाव पथकाने आतापर्यंत सहा हजारांहून अधिक नागरिकांना वाचवण्यात आले आहे.


हे दृश्य श्रीनगरच्या जुन्या भागाचे आहे, जेथे कार पाण्यात पोहताना दिसत असून बाजारात एकदम सुनसान आहे.  
 

 
हे दृश्य श्रीनगरच्या जुन्या भागाचे आहे, जेथे कार पाण्यात पोहताना दिसत असून बाजारात एकदम सुनसान आहे.
कुठे आहे लाल चौक : हा फोटो श्रीनगरच्या लालचौक आहे, जो आता एका तलाबात बदला आहे.
कुलगाम स्थित न्यूच ब्रिजावर लोक छ‍त्री घेऊन नदीच्या उग्र प्रकोप बघत आहे.  
 
मेंदी ब्रिज अनंतनाग, जेथे ब्रिज कुठेच दिसत नाही आहे. दिसत आहे तर फक्त चारीकडे पाणीच पाणी.  
 
श्रीनगरमध्ये जैमकैश व्हीलकलऐडच्या समोरचे दृश्य आहे, जेथे पाण्यात बुडलेल्या कारी एकमेकींना टक्कर देत आहे.  
मागाम बडगाममध्ये चारीकडे निरवता पसरलेली आहे. पाण्यामुळे जास्त करून लोकं घरातच बसलेले आहेत.  
 
श्रीनगरचा हा भाग जेथे एक महिला आपल्या मुलाला शाळेत किंवा घरी आणत आहेत.  
फतह कदल (श्रीनगर) झेलम नदी पावसाच्या पाण्यामुळे अशी दिसत आहे.
बारामुल्ला पट्‍टनमध्ये घराजवळ पाणी भरल्यामुळे लोकं सुरक्षित जागेवर जात आहे. 

श्रीनगरमध्ये जिरो ब्रिज ते झेलम नदीचा विराट रूप असा दिसत आहे. वादळ आपले रूप दाखवत आहे जसे आतच फाटणार आहे. 
गंदरबलमध्ये सिंध नदीचा एक दृश्य. पर्वतांमुळे हे दृश्य अधिकच सुंदर दिसत आहे.
रैनवाडी छोपियाचा एक दृश्य, जेथे लोक पाण्याला बघत आहे.
मट्‍टन अनंतनागचा एक दृश्य, जेथे लोकं पाण्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे.
श्रीनगर शहरात झेलम नदीच्या जवळपासचे सुंदर दृश्य. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments