Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ट्विटर मिरर' वापरणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान!

Webdunia
गुरूवार, 20 नोव्हेंबर 2014 (11:49 IST)
'ट्विटर मिरर' या सुविधेचा वापर करणारे ते जगातील पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना मान मिळाला आहे. देशवासियांच्या संपर्कात राहण्यासाठी ट्विटरचा सर्वाधिक वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 लाख फॉलोअर्सचा महत्त्वाचा टप्पा बुधवारी पार केला. पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 40 लाखांनी वाढली आहे.
 
मोदी सध्या विदेशी दौर्‍यावर आहे. मोदींनी ट्विटरवरील 'ट्विटर मिरर' या सुविधेचा वापर केला. या माध्यमातून त्यांनी ऑस्ट्रेलिया भेटीवेळी तेथील पंतप्रधान टोनी अबॉट आणि क्विन्सलॅंड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत स्वतःचा सेल्फी काढला.
 
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात देशातील आणि परदेशातील नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्याबरोबर स्वतःचे अनुभव शेअरिंग करण्यासाठी मोदींकडून ट्विटरचा परिणामकारक वापर केला जातो. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments