Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर शंभर मुलींना हिंदू बनवू, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य (‍व्हिडिओ)

Webdunia
बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (16:10 IST)
हिंदू मुलींना बळजबरीने धर्मांतरास भाग पाडले जात असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'एका हिंदू मुलीचे धर्मांतर करत असतील तर आम्ही त्यांच्या शंभर मुलींना हिंदू बनवू', असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे नेते आदित्यनाथ यांनी केल्याचे बुधवारी उघडकीस आले आहे. 
 
आदित्यनाथ यांच्या वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. मात्र, ही क्लिप 2009 मधील आहे.  लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात आदित्यनाथ यांनी वरील वक्तव्य असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशात हिंदू मुली मुस्लीम मुलांबरोबर विवाह का करत आहेत, असा प्रश्न आदित्यनाथ यांनी के आहे. परंतु, उत्तर प्रदेश सरकारकडे या प्रश्नाबाबत कोणतेही उत्तर नाही. गोरखपूरमधील एक तरुणाने या विरोधात कोर्टात  याचिका दाखल केली आहे. उत्तर प्रदेशात मुस्लीम मुली हिंदू मुलांबरोबर विवाह करत आहेत. कोणी हिंदू होऊ इच्छित असेल तर आम्ही स्वीकार करण्यास तयार आहोत. 
 

दरम्यान, आदित्यनाथ यांचा वादग्रस्त वक्तव्य असलेला व्हिडिओ क्लिप एका वृत्तवाहिनीने प्रसारित केला आहे. मात्र, व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर आदित्यनाथ यांनी आपण असे बोललोच नसल्याचे म्हटले आहे. 
(Courtesy: Youtube)

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments