तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे . जयललिता यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या जागी ओ. पन्नीरसेल्वम यांची नियुक्ती करण्यात आलीय. पण जयललिता याच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आहेत, मात्र कारभार हेपन्नीरसेल्वमांक बघणार आहेत. . जयललिता यांच्या गैरहजेरीत ओ. पन्नीरसेल्वम हे कॅबिनेटच्या बैठका घेतायत. त्यामुळेआता ओ. पन्नीरसेल्वम हेच तामिळनाडूचा कारभार सांभाळतील असे सध्या चित्र आहे.