Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिरंगा लावण्याचे विद्यापीठांना आदेश

Webdunia
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला असताना केंद्र सरकारने सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये राष्ट्रध्वज लावण्याचे आदेश जारी केले आहे. विशेष म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी ‘जेएनयू’पासून करावी, असे सूचित करण्यात आले आहे. स्मृती इराणी यांच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा आदेश दिला आहे. 
 
झेंड्यासाठी 207 फूट खांब असावा आणि 125 किलो वजनाचा तिरंगा असावा, असे आदेशात म्हटले आहे. हा झेंडा कायमस्वरूपी फडकवण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशावर विद्यार्थी संघटना अथवा राजकीय पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments