Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तृतीयपंथीयांना मिळाले 'थर्ड जेंडर'; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

Webdunia
मंगळवार, 15 एप्रिल 2014 (17:16 IST)
सुप्रिम कोर्टाने तृतीयपंथीयांबाबत मंगळवारी सकाळी महत्त्वपूर्ण ‍निर्णय दिला आहे. तृतीयपंथींयांना 'थर्ड जेंडर' अर्थात तिसरे लिंग म्हणून सुप्रिम कोर्टाने मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी तृतीयपंथीयांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा द्याव्यात, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. तृतीयपंथीयांना लिंग दर्जा देणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

तृतीयपंथीयांसाठी लढणार्‍या लक्ष्मी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला. तृतीयपंती हे सामाजिकदृष्टा मागासलेले असल्याचेही कोर्टाने यावेळी सांगितले. तृतीयपंथी हेही या देशाचे नागरिक असून त्यांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक मान्यता मिळवण्याचा समान अधिकार आहे तृतीयपंथीयांवर होणारे अत्याचार, त्यांना मिळणारी भेदभावाची वागणूक याबाबत सुप्रीम कोर्टाने काळजीही व्यक्त केली. देशभरात 19 लाख तृतीयपंथी असून, या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण आणि ऐत‍िहासिक निकालामुळे फारच आनंद झाला. भारताची नागरिक असल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मी त्रिपाठी यांनी दिली आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला