Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंजाबमध्ये नर्सवर सामुहिक बलात्कार

Webdunia
बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (12:45 IST)
दिल्लीत सफदरजंग रुग्णालयातील एका नर्सवर पंजाबमधील बुढलाडा येथे गॅंगरेप करण्‍यात आल्याची घटना घडली आहे. दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री 'निर्भया'वर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. निर्भयाला सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले होते. दरम्यान पीडितेनेच निर्भयाची देखरेख केली होती. परंतु निर्भयाचा सिंगापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता.  
 
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. वैद्यकीय तपाणीसाठी पीडितेला मानसा येथील रुग्णालयात आणले आहे. 
 
गेल्या काही दिवसांपूर्वी बुढलाडा येथील रमनदीप कौर नामक एक महिला पीडितेला भेटली होती. तिच्या नवर्‍यासह त्याच्या साथीदार्‍यांनी पीडितेला धोक्याने पंजाबमध्ये बोलावून तिच्यावर एका शेतातील ट्यूबवेलच्या खोलीत सामूहिक बलात्कार केला. बलविंदर सिंह उर्फ राजबीरशी असे प्रमुख आरोपीचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments