Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधानपदाची महत्तवाकांक्षा नाही - अडवाणी

वेबदुनिया
WD
भारतीय जनता पक्षाने आपल्याला जे हवे होते, त्यापेक्षा कितीतरी जास्त दिलेले आहे. आता पंतप्रधानपदाचीही मला अपेक्षा नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते ला लकृष् ण अडवाणी यांनी सांगितले. अडवाणी यांनी आपल्या 85व्या वाढदिवसानिमित्त आयोजित घरगुती कार्यक्रमात ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सकाळी अडवाणींना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानपदापेक्षाही बरेच काही पक्षाने दिले आहे. त्यामुळे हे पद प्राप्त करण्याची महत्तवाकांक्षा नाही, असे अडवाणी यांनी स्पष्ट केले. बरेच लोक म्हणतात की, माझी पंतप्रधान होण्याची महत्तवाकांक्षा आहे, पण पक्षापेक्षा दुसरे काही मोठे आहे, असे मला वाटत नाही, अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली. रशियाचे भारतातील राजदूत अलेक्झांडर कडाकिन यांनी अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे चरणस्पर्श केले. गडकरी यांनीही अडवाणींचे चरणस्पर्श करून त्यांना आशीर्वाद घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्यास अडवाणी तयार नसल्याची जोरदार चर्चा आहे. कोअर समितीच्या बैठकीनंतर पक्षाने गडकरी यांचे अध्यक्षपद कायम राहील, हे स्पष्ट करतानाच त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याची घोषणा केली होती.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments