Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधानपदासाठी नितिशकुमारच योग्य

वेबदुनिया
WD
भाजपसाठी आता त्यांच्याच पक्षाचे असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे डोकेदुखी ठरत चालले आहेत. आज पुन्हा त्यांनी बिहारच्या नितीशकुमार यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे मटेरियल आहेत. त्यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, असे जाहीर विधान शॉटगनने केले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकांची धुरा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे मोदी हेच एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील ही सुध्दा काळ्या दगडावरची रेघ आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाचेच एक नेते शत्रुघ्न सिन्हा हे मात्र सातत्याने पक्षाला मनस्ताप देणारी विधाने करत आहेत.

भाजपात पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण आडवाणी हीच माझी पसंती असेल, त्यांनी नाही म्हटले तर त्यांच्या पसंतीने दुसरा उमेदवार ठरवला जावा, असे विधान काही दिवसांपूर्वीच सिन्हा यांनी केले होते. त्यानंतर आता बिहारी बाबू सिन्हा यांनी सध्याचे भाजपचे आणि मोदींचे शत्रू नंबर वन नितीश कुमार यांचेच गुणगान गायले आहेत. नितीशकुमार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे आणि त्यांच्या क्षमतेबद्दल कोणालाच शंका असू शकत नाही. असे चिन्ह यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. भाजप आणि जेडीयूतील युती तुटण्यास नितीशकुमार यांना जबाबादार धरता येणार नाही, असे सांगत युती तुटण्यामागचे नेमके कारण सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. त्यांचा रोख मोदींकडे होता, हे त्यावरून दिसत आहे.
- See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?id=83579&cat=Mainpage#sthash.1fQ7pb3J.dpu f

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments