Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारशी विवाह करणार होते शशी थरूर!

Webdunia
बुधवार, 23 जुलै 2014 (14:12 IST)
केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या  मृत्युला आता वेगळे वळण लागले आहे. याप्रकरणी एक मोठा  खुलासा समोर आला होता. शशी थरुर हे सुनंदा पुष्कर यांना  घटस्फोट देऊन पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिच्याशी विवाह  करण्‍याच्या विचारात होते, असा खुलासा एका वृत्तवाहिणीने केला  आहे.
 
वृत्तवाहिणीच्या अहवालानुसार, शशी थरुर हे सुनंदाला घटस्फोट देवून  पत्रकार मेहर तरार हिच्याशी चौथा विवाह करणार होते, असे सुनंदाची  पत्रकार मैत्रिण नलिनी सिंह हिने पोलिसांना जबाब नोंदवताना  सांगितले. मेहर आणि शशी थरूर हे दोघे लोकसभा निवडणूक  2014 नंतर विवाहबद्ध होणार होते. याशिवाय शशी थरूर आणि  त्याचे साथिदारांचे जबाबातही मोठी तफावत असल्याचे नलिनीसिंह हिने  म्हटले आहे.
 
मृत्यू होण्यापूर्वी एक दिवस आधी सुनंदाने आपल्याला फोन करून या  सगळ्या गोष्‍टी सांगितल्या होत्या, असेही नलिनीसिंह हिने पोलिसांना  सांगितले आहे. याशिवाय तरार ही शशी थरूर यांच्याशिवाय जगू  शकत नसल्याचा मेसेज देखील सुनंदाने आपल्याला पाठवल्याचे  नलिनीने म्हटले आहे. शशी थरूर यांच्या कुटुंबीयांकडूनही दोघांच्या  विवाहाला संमती मिळाली होती. याशिवाय शशी थरुर आणि मेहर  तरार या दोघांनी जून 2013 मध्ये दुबईत एका हॉटेलमध्ये तीन  दिवस सोबत घालवल्याचे सुनंदाच्या दुबईतील एका मित्राने सांगितले होते.
 
नलिनीसिंह हिच्या जबाबाने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले  आहे.दरम्यान, नलिनीच्या खुलाशात किती तथ्य आहे, याचा शो   दिल्ली पोलिस घेत आहे. 17 जानेवारी 2014 रोजी सुनंदा  पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये आढळला होता. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments