Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 9 जणांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2016 (12:44 IST)
पुण्याच्या बालेवाडी परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा सोळाव्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने नऊ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली.
 
बालेवाडीच्या किर्लोस्कर कमिन्स ऑफिससमोरील या इमारतीचं काम सुरु होतं. मात्र त्याचवेळी सोळाव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
 
पार्क ग्रांजर आणि पार्क एक्स्प्रेस नावाच्या सोसायटीच्या साईट्स होत्या. त्यातील पार्क एक्स्प्रेस या इमारतीचा स्लॅब कोसळला. अरविंद जैन, श्रवण अगरवाल या दोन बिल्डर्सच्या प्राईड पर्पल बांधकाम कंपनीचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स आहेत.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments