Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंगळुरू बलात्कारप्रकरण: शाळेचा अध्यक्ष अटकेत

Webdunia
गुरूवार, 24 जुलै 2014 (09:00 IST)
बंगळुरुमधील एका नावाजलेल्या शाळेत सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्काराच्या घटनेला वेगळे वळण लागले आहे. पोलिसांनी बुधवारी शाळेचा अध्यक्ष रुस्तम केरावाला याला दमन येथे अटक केली. यापूर्वी पोलिसांनी शाळेतील स्केटींग टीचरला अटक केली होती. त्याच्या लॅपटॉममध्ये अश्लील व्हिडिओ आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी शाळेचा अध्यक्ष रुस्तमला अटक केली आहे. विशेष म्हणजे रुस्तम हा देखील पोर्न अॅडीक्ट आहे. पोलिस या प्रकरणातील दुसर्यात आरोपीचा शोध घेत आहेत.

विद्येच्या मंदिरात अश्लील चाळे होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बंगळुरूमधील व्हिबग्योर हायस्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकणार्याव एका सहा वर्षीय मुलीवर शाळेच्याच एका शिक्षकाने आणि सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला होता. गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले होते. त्यानंतर पोलिस तपासाला वेग आला होता. पोलिसांनी रविवारी शाळेतील स्केटींग मार्गदर्शक मुस्तफाला संशयावरून अटक केली. पोलिसांना मुस्तफाजवळ मुलांच्या अश्लिल व्हिडीओंसमवेत अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आला. मुस्तफाबद्दल सांगताना पोलिस म्हणाले की, त्याला अश्लिल व्हिडीओ पाहण्याची सवय होती. शाळेतील मुलांशी असभ्य वर्तन केल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. मुस्तफाला शाळा प्रशासनाने तीन वेळा वर्तवणूक सुधारण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र तरीही त्याने न ऐकल्याने त्याला शाळेतून हाकलून देण्यात आले होते.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi