Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बच्चन, तेंडुलकर फुकट करणार वाघ वाचविण्याचे आवाहन

Webdunia
मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (11:06 IST)
महाराष्ट्रातील वाघ वाचविण्यासाठी सरकारतर्फे सुरु असलेल्या व्याघ्र प्रकल्पाकरिता अभिनेता अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना साकडे घालण्यात आले आहे. मात्र, यासाठी त्यांना एक रुपयाही देण्यात येणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

वाघांची घटती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने वाघ बचाओ माहीम हाती घेतली आहे. व्याघ्र प्रकल्पाकरिता अभिनेता अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी मदत करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. या प्रकल्पासंबंधी माहिती देणार्‍या प्रदर्शनाचे आज मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments