Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बदनामीच्या भीतीने अल्पवयीन मुलीने पेटवून घेतले

Webdunia
बुधवार, 23 एप्रिल 2014 (10:14 IST)
मध्य प्रदेशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्याच बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिंग्रोलीमध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा शेजारी राहणार्‍या व्यक्तीने विनयभंग केल्यानंतर मुलीने स्वत:ला पेटवून घेतले आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. विनयभंगानंतर बदनामीच्या भीतीने पीडितीने स्वत:ला पेटवून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितीवर गेल्या दोन दिवसांपूर्वी तिच्या शेजारी राहणार्‍या एका नराधमाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर मुलीला वाटले तिची समाजात बदनामी होईल, या भीतीमुळे तिने सोमवारी स्वतःला पेटवून घेतले. यात ती गंभीर भाजली गेली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात एका चौदा वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कार केल्यानंतर तिला धावत्या बसमधून खाली फेकून देण्यात आले होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments