Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानचे जवान भिडले

Webdunia
शुक्रवार, 24 जून 2016 (11:40 IST)
हुसेनीवाला बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सोहळ्यातच दरम्यान भारत आणि पाकिस्तानचे जवान भिडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल होत आहे. बीटिंग रिट्रीट सेरेमनीदरम्यान दोन्ही देशांचे जवान एकमेकांच्या देहबोलीतून राग व्यक्त करतात. पण कधीही थेट मारहाणीची वेळ आली नव्हती.

मारहाण झाल्याने काहीवेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या ठिकाणी नेहमीप्रमाणे बीटिंग रिट्रीट सोहळा सुरु होता. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तानच्या जवानाची टक्कर झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यानंतर दोघांना वेगळं करण्यासाठी इतर जवानांना मध्ये पडावं लागलं.

तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
दोन्ही जवानांनी हातात आपापल्या देशांचे झेंडे घेतले होते. याचवेळी त्यांची टक्कर झाली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments