Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भटकळच्या सुटकेसाठी केजरीवालांच्या अपहरणाचा डाव

गुप्तचर विभागाची माहिती

वेबदुनिया
WD

नवी दिल्ली- दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीचा म्होरक्या यासिन भटकळ याच्या सुटकेसाठी त्यांच्या साथीदार्‍यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अपहरण होण्याची शक्यता असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट घोषित केला आहे.

गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या सूचनेनुसार अरविंद केजरीवाल यांचे अपहरण करण्‍याचा डाव भटकळ यांच्या सा‍थीदार्‍यांनी रचला आहे. दुसरीकडे उलट केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांची कानउघाडणी केली आहे. दिल्ली पोलिसांचा दावा केजरीवाल यांनी फेटाळून लावला आहे. पोलिस राजकारण करीत आहेत. याबाबतची माहिती मीडियाला न देण्याच्या सूचना दिल्यानंतरही अधिकार्‍यांनी त्याचे पालन न केल्याने केजरीवाल चांगलेच भडकले होते.

या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने संपूर्ण शहरात हायअलर्ट जारी केला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments