Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भागवतच मोदी सरकारचे खरे ‘बॉस’ : काँग्रेस

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (10:32 IST)
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले तरी भारत सरकारचे खरे ‘बॉस’ राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
 
आरएसएस आणि त्याच्याशी संबंधित सर्व संघटनांच्या समन्वय समितीची तीनदिवसीय बैठक नवी दिल्लीत सुरू झाली आहे. मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या बैठकीत संघाकडून केंद्रातील भाजप सरकारच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काल या बैठकीला हजेरी लावली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आज बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
 
संघ आणि भाजपमधील या समन्वयाच्या निमित्ताने काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. सध्याचे भाजप सरकार हे आरएसएस आणि उद्योगपतींच्या हातचे बाहुले आहे. 
 
या बाहुलची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दोरी आरएसएसच्या हातात आणि आर्थिक दोरी उद्योगपतींच्या हातात आहे, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी हाणला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments