Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत-पाक मुंबईतच भिडावेत : भाजप

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2015 (10:21 IST)
भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांना सेनेने विरोध केला आहे तर याउलट हा सामना मुंबईतच व्हावा, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली आहे. 
 
भारत-पाकमधील क्रिकेट सामने यूएई येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानी क्रिकेट बोडार्ने बीसीसीआयसमोर ठेवला होता. यासंदर्भात वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयच्या कार्यालयात होणार बैठक सेनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. हा सामना मुंबईतच व्हावा अशी भाजपची इच्छा असल्याचे भारतीय जनता पाटीर्चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाल्यास भारतीय जनता पार्टी त्याचे स्वागतच करेल. राज्य सरकार अशा सामन्यासाठी संपूर्ण पोलीस संरक्षणदेखील देईल, असे सांगत दानवे यांनी शिवसेनेच्या भूमिकेला विरोध दर्शविला. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments