Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनमोहन पंतप्रधानपदी कायम राहतील: कॉंग्रेस

वेबदुनिया
गुरूवार, 14 जून 2012 (14:44 IST)
PTI
PTI
विद्यमान पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे २०१४ पर्यंत पंतप्रधानपदी कायम राहतील, असे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. सपुआ-२ सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपेपर्यंत नेतृत्वबदलाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

काल (बुधवारी) ममता आणि मुलायम सिंह यांनी राष्ट्रपतीपदासाठी डॉ. मनमोहन सिंह यांचे नांव समोर केल्यानंतर सपुआ-२ सरकारमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानुसार मनमोहन सिंह हे राष्ट्रपती बनतील तर प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदी आरूढ होतील, असा अंदाज व्यक्त झाला होता.

मात्र सपुआतील प्रमुख पक्ष कॉंग्रेसने एखादा घटक पक्ष किंवा सहकारी पक्ष संख्याबळाच्या जोरावर सपुआवर आपली पसंत थोपवू शकत नाही. ते 'किंगमेकर' बनून पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीपदासारख्‍या सवौच्च घटनात्मक पदास बाहुले बनू देणार नाही, हे कॉंग्रेसने आज ठणकावून सांगितले.


जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments