Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी हिंदू, माझ्या घरात 9 मंदिरे- दिग्विजय

वेबदुनिया
WD
कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांनी ब्लॉगवर म्हटले आहे की, हिंदू असून, माझ्या घरामध्ये नऊ मंदिरे आहे. दररोज मी अर्धा तास देवांची पूजा करतो.

सोशल नेटवर्किंगचा नेहमी; वापर करणारे दिग्विजयसिंह म्हणाले, "मला डॉग्विजयसिंह व कधी-कधी पिग्विजयसिंह म्हटले जाते. मला या नावाने संबोधणारे अनेकजण माझ्या नातवाच्या वयापेक्षाही कमी आहेत. माझ्या विषयी कोणी काहीही वक्तव्ये करत असले तरी मी सर्वच धर्मांचा आदर करतो.'

" मी हिंदू असून, द्वारका येथे 1983 मध्ये जगद्‌गुरू शंकराचार्य व जोशी मठामध्ये दीक्षा घेतली आहे. दररोज न चुकता मी अर्धा तास पूजा करतो. एकादशीला उपवास करत असून, अन्य धर्मांचेही पालन करतो. एवढे असतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला हिंदू विरोधी म्हणत आहेत. मात्र, सर्वच धर्मांचे पालन करणारा नेहमीच चांगला हिंदू असतो,' असेही दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments