Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलायम सिंह वाढदिवशी 75 फुटांचा केक कापणार

Webdunia
शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (10:27 IST)
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचा आज (शनिवारी) वाढदिवस असून ते 75 फुट लांबीचा केक कापणार आहेत. मुलायम सिंह यांचा वाढदिवस मोठया थाटात साजरा करण्‍यात येणार असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. 
 
मुलायम यांच्या वाढदिवसासाठी उत्तर प्रदेश सरकारने दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच रामपूर प्रशासन 30 लाख रूपये खर्च करत असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
वाढदिवशी मुलायम सिंह यांची भव्य मिरवणूक काढली जाणार असून त्यासाठी खास लंडनहून व्हिंटेल बग्गी मागविण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून या मिरवणुकीला सुरूवात होणार असून युनिव्हर्सिटी गेटवर मिरवणूक थांबणार आहे. मिरवणुकीदरम्यान मुलायम यांच्यावर दोन्ही बाजुनी त्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त रामपूरमध्ये जवळपास दोनशो कमानी, शेकडो बॅनर लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण केले जाणार असून त्यासाठी मोठमोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांच्यासह उत्तर प्रदेश मंत्रीमंडळातील 50 मंत्री उपस्थित राहणार आहेत.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments