Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलीच्या छेडखानीस विरोध कराणार्‍या पित्याची हत्या

Webdunia
बुधवार, 16 एप्रिल 2014 (12:59 IST)
उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यामधील इंचौली भागामध्ये आपल्या मुलीची छेड काढण्यास विरोध करणार्‍या एका 42 वर्षीय डॉक्‍टरची तीन तरुणांनी निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. निशु, राहुल व मयंक अशी या आरोपींची नावे आहेत. मृत इंद्रेश पराशर यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केरली आहे.

सर्व आरोपी गंगानगर येथे राहतात. आरोपी पराशर यांच्या मुलीची कायम छेड काढत असत. सोमवारी पराशर यांनी शर्मा यांच्या घरी जाऊन या तिघांची तक्रार केली होती. यावर संतप्त झालेल्या आरोपींनी पराशर यांना ठार मारले.

पराशर हे आपल्या दवाखान्यामधून घरी येत असताना आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी सळई व स्टीक्‍सच्या सहाय्याने हल्ला केला. यावर पराशर यांनी आपला जीव वाचविण्याकरता जवळील एका व्यायामशाळेत आसरा घेतला. मात्र या आरोपींनी तेथेही पोहोचून पराशर यांना अत्यंत निर्घृणतेने मारहाण केली. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पराशर यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपींपैकी निशु याला अटक झाली असून इतर दोघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments