Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लान्सनायक हनुमंतअप्पा शहीद

Webdunia
गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (13:53 IST)
लान्सनायक हनुमंतअप्पा सियाचीनमधील उणे ४५ अंश तापमानात ३५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आणि ६ दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आले असून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात गुरूवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. 
 
गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून कोमात असलेल्या हनुमंतअप्पा यांची प्रकृती ढासळतच गेली, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती. हनुमंतअप्पा हे असामान्य जवान असून त्यांनी दुर्दम्य धैर्य आणि संयमाचे दर्शन घडविले आहे, या शब्दांत मोदींनी प्रशंसा केली.
 
पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ १९,६०० फूट उंचीवरील लष्करी चौकीवर २ फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्यामुळे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते. हे सर्व जवान शहीद झाल्याची भीती लष्कराने वर्तवली होती. हाडे गोठवणाऱ्या थंडीत अतिशय प्रतिकूल वातावरण असताना लष्कराच्या शोधपथकाने सहा दिवसांपासून रात्रंदिवस अथक शोधमोहीम चालवली असता सोमवारी रात्री उशीरा बर्फ कापल्यानंतर त्या पथकाला हनुमंतअप्पांच्या हालचाली आढळून आल्या. त्यांना लगेच एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र सहा दिवस उणे ४५ अंश तापमानात बर्फाखाली गाडलेल्या अवस्थेत राहिल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने ते कोमात गेले होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. काल रुग्णालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार हनुमंतअप्पा यांची किडनी व यकृत काम करत नसून त्यांचा रक्तदाब वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच त्यांच्या मेंदुला ऑक्सिजन पुरवठाही नीट होत नव्हता आणि या सर्वात कहर म्हणजे त्यांना न्युमोनियाही झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आज सकाळी हनुमंतअप्पा यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने डॉक्टरांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि सकाळी पावणेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments