Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनी मंदिरात महिलांच्या प्रवेशामुळे वाढतील बलात्कार-स्वरूपानंद सरस्वती

Webdunia
सोमवार, 11 एप्रिल 2016 (17:36 IST)
द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती तसं तर धार्मिक विवादांना दुजोरा देतच राहतात, पण आता त्यांनी म्हटले आहे की शनी मंदिरात महिलांच्या प्रेवशामुळे बलात्कारांच्या घटनेत वाढ होईल.  
त्यांनी महाराष्ट्राच्या शनी शिंगणापुरात महिलांच्या प्रवेश बाबद देखील प्रश्न ठेवला आहे. त्यांनी म्हटले, 'ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होत आहे ते तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत महिला शनी देवाची पूजा करणे बंद करणार नाही.' त्यांनी म्हटले की शनी काही देव नसून हा एक ग्रह आहे आणि ग्रहाची शांती पूजा केली जात नसते. स्वरूपानंद सरस्वतीने या अगोदर देखील शनी शिंगणापुरात महिलांना प्रवेश देण्याबद्दल विरोध केला होता. 
 
साईबाबांच्या पुजेमुळे दुष्काळ 
शिर्डीच्या साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ निर्माण झाला आहे, असे खळबळजनक विधान द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.
 
साईबाबा देव नाहीत त्यांची पुजा करु नये असे म्हणणारे स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, साईबाबा फकीर होते म्हणून त्यांची देव म्हणून पुजा करणे अशुभ आहे. ज्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते त्याठिकाणी निसगार्चा प्रकोप होतो. त्या ठिकाणी दुष्काळ, पूर यासारखी संकट येऊन मृत्यूचे भय निर्माण होते, असे ते म्हणाले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments