Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सानिया मिर्झाला तेलंगणाकडून एक कोटी!

Webdunia
मंगळवार, 22 जुलै 2014 (11:11 IST)
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला प्रशिक्षणासाठी तेलंगणा राज्यातर्फे एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्‍यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही माहिती आहे.

सानिया मिर्झा ही टेनिस विश्वात पाचव्या स्थानावर आहे. सानिया यूएस ओपनमध्ये सहभागी होणार आहे. त्यासाठी तिला ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयातर्फे मंगळवारी सानियाला चेक दिला जाणार आहे.

सानिया मिर्झाची आर्थिक परिस्थिती सधन आहे. तसेच त‍िने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाह केला होता. तसेच तेलंगणा राज्य स्थापन होऊन एक वर्षही पूर्ण झाले नसताना सानियाला एवढी मोठी मदत जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments